आर्वी :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आमदार सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्वी येथील माहेश्वरी भवन येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या आयोजित शिबीरात 56 आर्वी ग्रामीण व 55 आर्वी शहर मधुन असे एकंदरीत 111 रक्तदात्यांनी रक्त दान केले. तसेच ग्रामपंचायत पिंपळा पुनर्वसन येथे आमदार सुमित वानखेडे यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र ठाकरे अध्यक्ष भाजपा ग्रामीण व राजकुमार मनोरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून निसर्ग जपला पाहिजे म्हणून मुख्यमंत्रींच्या जन्मदिन वृक्षारोपण करण्यात आले.
दिनांक 22 जुलैला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस असतो. जन्मदिनाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा देण्यासाठी उत्सुक असतात. आपल्या जन्मदिनी पैशांचा अपव्यय टाळून लोकोपयोगी असे वैद्यकीय व जनहितार्थ उपक्रम राबवण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला आर्वी विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार सुमित वानखेडे यांनी देखील दाद देत मतदारसंघात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, वैद्यकीय तपासणी शिबीर आयोजित केले. त्यामुळे जन्मदिनाच्या निमित्ताने होणारा पैश्याचा अपव्यय न होता जनहितार्थ विविध उपक्रम राबवून अनेकांना त्यातून लाभ होईल. जनसेवाचा ध्यास घेतलेले आमदार सुमित वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष आर्वी तालुका व आर्वी शहर यांनी जन उपयोगी पडेल असेच उपक्रम राबवले.
आर्वी येथील भाजपा व युवा मोर्चा व्दारा आयोजित रक्तदान शिबीराचे संयोजक राजेंद्र ठाकरे, जितेंद्र ठाकरे, आशिष टिकले होते. या रक्तदान शिबीराला आमदार सुमित वानखेडे यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवत उपस्थितांना प्रोत्साहित केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजू ठाकरे, राहुल गोडबोले, प्रशांत वानखेडे, प्रशांत सव्वालाखे, संदीप काळे, विजय वाजपेयी, प्रशांत ठाकूर, अजय कटकमवार, जितेंद्र ठाकरे, आशिष टिकले, राजू पावडे, अशोक निकम, अश्विन शेंडे, धर्मेंद्र राऊत, राजेश हिवसे, बाळा सोनटक्के, पप्पू जोशी, मंगेश चांदूरकर, मनोज कसर, उषा सोनटक्के, सारिका लोखंडे, शुभांगी घाटे, शुभांगी पुरोहित, जया चौबे, कुणाल कोल्हे, सागर ठाकरे आदींनी प्रयत्न केले.