*आष्टी(श.)*: येथे भाजपची आष्टी तालुक्याच्या विस्तृत कार्यकारिणीची बैठक पार पडली.यावेळी आपण केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवा.तळेगावला ३०० बेडेड हॉस्पिटलला प्रशासकीय मान्यता मिळवुन देत १५५ कोटी रुपये मंजूर केले.संत्रा उत्पादक शेतकर्यांना नुकसानभरपाई ची मिळवुन दिलीली मदत आदींसारखे अनेक आपल्या सरकारने केलेली कामे सर्वश्रुत आहे.संघटनेचे काम करत असतांनी सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा व जनतेचा विश्वास संपादित करा असे आवाहन केले.तर, आपले पक्षाचे संघटन मजबूत असुन,येत्या आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींत नक्कीच आपन यश मिळवणार असे प्रतिपादन आमदार सुमित वानखेडे यांनी केले.
भारतीय जनता पक्ष आष्टी तालुक्यातील विस्तृत कार्यकारीनी ची घोषणा १ ते ५ ऑगस्ट या दरम्यान करण्यात आली.यांत विविध आघाड्यांचे ७ मोर्चे यांच्या अध्यक्ष व कार्यकारिणीची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली.यात नवनियुक्त सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची नियुक्ती नंतर पहिलीच विस्तृत कार्यकारिणीची बैठक आष्टीला काकडे लाॅन येथे पार पडली.कार्यक्रमाला भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष संजय गाते देखील उपस्थित होते.गाते यांनी सांगीतले कि आष्टी तालुका संघटनात्मक महाराष्ट्रात एक नंबरचा तालुका आहे.तालुक्यात पक्षांद्वारे दिलेले उपक्रम प्रभावी पने राबविले गेले.यामुळे याचा अभिमान वाटतो असे गाते यांनी त्यांच्या भाषणात सांगीतले.
यावेळी पक्षांतर्गत राबविले गेलेल्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन केल्या बद्दल अनेकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संघटनपर्व अंतर्गत प्राथमिक सदस्य नोंदणी लक्षपुर्ती केल्या बद्दल कमलाकर निंभोरकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंतीच्या तालुकाभर यशस्वी नियोजनासाठी रामदास लव्हाळे,मोदी सरकारचे ११ वर्ष संकल्प से सिध्द तक कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक विजयकर,सुनिल साबळे,अतुल गुल्हाने,डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनी समर्पन दिन च्या यशस्वी आयोजनासाठी गजानन भोरे,विशाल गाडगे, गुरुपौर्णिमेनिमित्त गावागावांतील शिक्षकवृंदांचा सत्काराच्या यशस्वी आयोजनाकरीता चंद्रशेखर बाबरे, २१ जुन योग दिवस व संकल्प चौपाल सभांच्या यशस्वी आयोजनांसाठी मनिष ठोंबरे,तर संविधान हत्या दिवसाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशांत काकपुरे,सचिन गावंडे,राजेश ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीराचे यशस्वीतेसाठी अनिरुध्द दंडाळे आदींना सन्मान चिन्ह,शाल व श्रीफळ देत गौरविण्यात आले.
तर आमच्या आष्टी तालुक्याची सर्व ७ ही मोर्चांची विस्तृत कार्यकारीनी जाहीर झाली असुन,तालुक्यात येत्या काही दिवसांत पक्षांतर्गत १० ऑगस्टला तिरंगा यात्रा,१४ ऑगस्ट विभाजन विभीषीका दिन यशस्वी पने राबविणार असल्याचे भाजपा आष्टी तालुकाध्यक्ष सचिन होले यांनी सांगीतले.
यावेळी कार्यक्रमाला आमदार सुमित वानखेडे,भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते,भाजपा तालुकाध्यक्ष सचिन होले,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर,भाजपा जिल्हामहामंत्री कमलाकर निंभोरकर,उत्तम करांगळे,रियाज खानसर,मनिष ठोंबरे,देवानंद डोळस,विशाल गाडगे,अतुल गुल्हाने,गजानन भोरे,श्रीराम ठोंबरे,किशनसींग चव्हाण,पंकज दुधकवरे,अनिरुध्द दंडाळे,रजनी डमके,आरती जाने,नंदा वरकड,छाया घोडीले,अंकिता होले,रवींद्र जाने,देवानंद पेठे,रावसाहेब गोरे,गंगाधर मडावी,रामदास लव्हाळे,प्रशांत कठाने व अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन देवानंद डोळस, ॲड मनिष ठोंबरे यांनी केले. तर आभार विशाल गाडगे यांनी मानले.