Dainik Shahid Bhumi Prahar Team
आष्टी (शहीद): दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी आर्वी, आष्टी, कारंजा तालुक्यात जोरदार मुसळधार पावसाने वर्धा नदीला तसेच या भागातील लहान मोठया नदया व नाल्यांना मोठया प्रमाणात पूर आलेत. तसेच उर्ध्व वर्धा धरणातून आच नदीत पाणी सोडण्यात येत असल्याने वर्धा नदी आधीच दुथडी भरुन वाहत होती. अशा परिस्थितीत काल या भागात जोरदार ‘न भूतो न भविष्यती’ असा आभाळ फाटल्यागत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या भागात नदी नाल्यांना पूर येऊन नदीपात्राबाहेर लोकांच्या शेतात मोठया प्रमाणात पाणी आले व सखल भागात सुध्दा पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. यात वाघोली नाल्यावरील पुल वाहून गेला तर नरसापूर ,खडकी, सिरसोली, धाडी, साहूर, बोरगाव टूमणी तसेच कारंजा तालुक्यातील शेतीपिकासह पिके खरडून नेली. सोयाबीनचे पिक हातातोंडाशी आले असतांना तसेच कापूस व इतर पिकांची परिस्थिती चांगली असतांना निसर्गाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून नेला. खासदार श्री अमर काळे यांनी त्या सर्व परिस्थितीची माहिती घेऊन आज या भागात दौरा केला. त्यांनी या दौऱ्यात वाघोली नाल्यावरील वाहून गेलेला पुल, नरसापूर-खडकी सिरसोली, धाडी, बोरगाव टूमणी साहूर येथील पिके वाहून गेलेल्या शेतांची तसेच वाघोली येथील पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देश दिलेत. तसेच सोयाबीनवर आलेला करपा रोग व संत्रा, मोसंबी फळगळ याचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. पाहणी केली. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाचे कोपाने असा हिरावून घेतल्याने खासदार श्री अमर काळे यांचे भेटीत शेतकऱ्यांशी चर्चा करतांना नकळतच शेतकऱ्यांच्या डोळयात अश्रू तरळले. शेतातील पिकांची व शेताची अवस्था पाहून शेतकऱ्यांच्या तोंडून शब्दही अबोल झाले होते. अशा या हवालदील शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न खासदार श्री अमर काळे यांनी केला. त्यांनी हा सर्व हृदय हेलावून टाकणारे दृश्य व शेतकऱ्यांच्या डोळयातील अश्रु पाहून तात्काळ त्यांनी प्रशासनाला फोन लावलेत व त्यांना तात्काळ पंचनामे करुन अहवाल शासनास सादर करावेत असे निर्देश दिलेत.
या दौऱ्यात खासदार अमर काळे यांच्या सोबत कृषी विभाग व महसुल विभागाचे स्थानिक अधिकारी उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते रवी गंजीवाले, अनिल नागपुरे, जितू शेटे, प्रवीण खैरकार, राजू नागपुरे, सुरज ढोले, प्रसाद वरकड, सोनु माणिकपुरे, निलेश वानखेडे, दिलीप भाकरे, बाबारावजी भिसे, गजाननराव गायकवाड, प्रवीण नागपुरे, पवन नागपुरे, निखिल भडके, इत्यादी मंडळी उपस्थित होते.