आर्वी :- अखिल भारतीय महानुभाव परिषद वर्धा जिल्हा तथा श्रीकृष्ण मंदीर सेवा समिती आर्वी याचे संयुक्त विद्यमाने आयोजित महानुभाव पंथीय संत्संग भव्य मेळावा आर्वी येथील सहकार मंगल कार्यालयात संपन्न झाला. मेळाव्यामध्ये हजारोच्या संख्येने महानुभाव पंथीय उपस्थित होते. व त्यांना कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा, राज्यमंत्री तथा वर्धा जिल्हाचे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आर्वी विधान सभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे, विधानपरिषद सदस्य दादाराव केचे, सौ.मयूराताई अमरजी काळे, पुरुषोत्तम ठाकरे प्रमुख प्रवचनकार पु.पु.ई. सुरेशराव राहेकर, महंत सेवात्कर बाबा, बोराळकर बाबा, घंटाघोष बाबा, बामेराज बाबा, यांनी अनुयायांना मार्गदर्शन केले. महानुभाव पंथीयांच्या महत्त्वाच्या तिर्थक्षेत्राना करोडो रुपयाचा निधी, तसेच रिद्धपूर येथे मराठी विद्यापिठ व महानुभाव पंथीयांचे गंगातिराला तीर्थक्षेत्राला जोडणारे अष्ठ शताब्धी महामार्ग तसेच प्रथमच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीची अवतार दिन शासन स्तरावर राबवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणविस यांनी महाराष्ट्रातिल महानुभाव पंथीय अनुयांचे स्वप्न पूर्ण केले. तसेच या कार्यात आमदार सुमीत वानखेडे यांचे नेहमीच सहकार्य लाभले असे उदगार अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष कारंजेकर बाबा यांनी काढले.
राज्य शासनाने महानुभाव पंथीय तिर्थक्षेत्रांचा विकास कामांकरिता खास करून रिद्धपुरच्या विकासा करिता निधी उपलब्ध करून दिला तसेच यापुढे पण कुठल्याच विकास कामांकरिता निधी कमी पडणार नाही, आमचे सरकार महानुभाव पंथीय बांधवाच्या पाठीशी भक्कम पणे उभे राहील. तसेच वर्धा शहराकरिता महानुभाव पंथीय भवनाकरिता जागा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच कार्यवाही करणार असल्याचे पालक मंत्री पंकज भोयर यांनी सांगितले. तसेच आमदार सुमित वानखेडे यांनी त्यांच्या विधान सभा क्षेत्रातिल महानुभाव पंथीयांच्या मंदीरला निधी उपलब्ध करून सोई सुविधा निर्माण केल्या जाईल तसेच वर्धा जिल्ह्यातील महानुभाव पंथ यांचे एकमेव ठिकाण असणाऱ्या श्री गोविंद प्रभू देवस्थान ट्रस्ट भिश्नुर तीर्थक्षेत्राचा विकास सर्वोत्तम सोयी सुविधा युक्त करण्याकरिता कुठलाच निधी कमी पडू देणार नाही असे विचार व्यक्त केले तर आमदार दादाराव केचे यांनी महानुभाव पंथीय जनसमुदायाला संबोधित केले. यावेळी हजारोच्या संख्येने संत महंत तसेच तपस्वीनी माता उपस्थिती होत्या. सदर कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महानुभव पंथीय अनुयायाची उपस्थिती होती. यावेळी पंचअवतार व महाप्रसाद व धर्मसभा पार पडली त्यावेळी निबंध स्पर्धेचे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्नेहल दादा येडनकर अध्यक्ष चंद्रशेखर बाबरे सचिव संजय पडोळे, बालू बोके, जितेंद्र ठाकरे, मधुकर चौकोने, वामनराव वानखडे गवळी समाज संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र ढोबळे, अनिल नागपुरे, जगदीश डोळे , अरविंद तव्वर, नपूल मेहरे, अमोल नागपुरे, बाळासाहेब विरुळकर, रवी गोडबोले, अशोक कालोकार, पुष्कराज कालोकार, विवेक गळहाट, दिवाकर शेळके, गणराज गळहाट रावसाहेब गोरे, कुशलभाऊ ठाकरे, बाबरावजी अवथळे, हेमंतराव देशमुख, कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रशेखर बाबरे संचालन प.पु. बामेराज बाबा बिडकर तर अभार प. पु. घंटाघोष बाबा यांनी मानले.