spot_img

**पत्रकारितेसह सामाजिक,आध्यात्मिक अनुकरणीय कार्य करणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे* *संजय खासबागे*

कर्माला पूजा समजून देव्हातल्या देवापेक्षा रस्त्यावरच्या माणसाला पाहणारा ,”रुग्ण सेवा ही उनच ईश्वर सेवा”व “रक्तदान श्रेष्ठ दान”ही म्हण हृदयात ठासून ठेऊन पुढे पाऊल टाकत पत्रकारितेसोबत समाजसेवेचे व्रत जोपासणारे व मंदिरात दररोज जाऊन पूजा पाठ केल्या पेक्षा दररोज माणसाला देव म्हणून गरिबाला,रुग्णाला मदत केली तरी तेच माझे अध्यात्मिक कार्य समजून पुढे चालत राहणे व समाजाला, तरुण वर्गाला आवश्यक संदेश देणे,म्हणजेच खरे जीवन जगणे होय. एवढे जरी कार्य केले तरी स्वर्गात स्थान मिळाल्याशिवाय राहणार नाही असा संदेश वारंवार देणारे आमचे जिवलग मित्राचा वाढदिवस ज्यांच्यामुळे माझं आयुष्य इतकं सुंदर झाल आहे. त्या माझ्या खास मित्राला आजच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा!! उच्च शिक्षित असल्याने लिखाणाची आवड समाजामध्ये होणारे अन्याय अत्याचार मुळे स्वस्थ बसू देत नव्हते.16 मे 2001ला लोकमत वृत्तपत्र समूहाचे तालुका प्रतिनिधी तथा पत्रकार म्हणून लेखणीतून आपल्या कार्याला सुरुवात केली.त्यावेळी लोकमत चे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय ज्ञानेश्वर बहुरूपी यांनी लेखणीतून धडे गिरवायला शिकविले आणि त्यांच्या व्यक्तिमत्व उराशी बाळगून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.असे हे संजय खासबागे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व व जीवनमित्र, कधीही त्यांना कितीही व्यस्त असताना आवाज जरी दिला तरी धावून येणारे,सहकार्य करणारे, वेळ पडली आर्थिक मदत सुद्धा करणारे, संजय भाऊ खासबागे वाढदिवसाच्या निमित्ताने ते बाराही महिने गोरगरिबांना आर्थिक मदत तर करतात.यांच्या कार्यतत्परेची दखल घेऊन आयबीएन लोकमत मध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये संधी मिळाली.यातूनही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही मध्ये कार्य करून समाजाला न्याय मिळवून दिला आणि निरंतर लोकमत मध्ये कार्य सुरू आहे.तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई चे ते अमरावती जिल्हाउपाध्यक्ष आहे.अशा विविध सेवाभावी संस्थां सोबत जोडले आहे.यातूनही समाजकार्य सुरू असून अध्यात्मिक कार्यात श्री परमहंस यशवंतबाबा शाश्वत अन्नदान ट्रस्ट मुसळखेडा येथील विश्वस्त आहे. यामुळे अध्यात्माची जोड सुद्धा देत आहे.त्यांची शैली पाहता ते रुग्णाला, तो कोणीही असो सुरुवातीपासून शेवटपर्यंत सहकार्य करण्याची भूमिका ठेवतात.कुणाला रक्ताची गरज असो हॉस्पिटल पर्यंत पोहोचवण्याचे काम व सोबत जाऊन थेट हास्पिटलमध्ये जाऊन काम सुद्धा आमच्या मित्र संजय याने अनेकदा केलेले आहे. करीत आहे. इतर मित्र सुद्धा त्यांचे अवलोकन करतातच आणि मदतीचा भाग हा वैयक्तिक नसून समाजात आपल्याला रहायचं आहे,त्यामुळे समाजाचे ऋण फेळायचं आहे. त्यामुळे ते कसलाही विचार न करता सर्वधर्मसमभावाची व्यक्ति म्हणून त्यांच्याकडे पाहायला जाते. कोणतत्याही संकट आले की संजयला फोन करावा व त्याने ते आपलं दुःख झेलाव अशी परिस्थिती अनेकदा अनुभवास आली. मित्रा शिवाय आयुष्य अपूर्ण आहे असे म्हणतात ना तशाच पद्धतीचे आमचे संजराव वाढदिवसाच्या निमित्ताने संजयराव तुमच्या कीर्तीचा तुमचा आनंद गगनात ना समाव असं सुख समाधान तुमच्या पदरात पडत राहो. तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा व्हावा यशाची शिखरे आपण अशीच चढत राहो कीर्ती तुमची आसमानता पसरत राहो, विजयाची ललकारी तुमची दाही दिशा गुंजत राहो! असे आमचे मित्रत्वाचे संबंध ते माझ्यासोबतच नाही तर अनेक मंडळी त्यांच्यासोबत आहेत. सुरुवातीपासूनच परिस्थिती नाजूक असताना सुद्धा त्यांनी कुणाचे मन दुखवली नाही. नेहमी गरीबीची जाणीव ठेवत, गरिबाला मदत करण्याची भूमिका ठेवली. त्यामुळे त्यांचे नावलौकिक वरुड क्षेत्रामध्ये आहेच. त्यांचा परिवार सुद्धा आजही एकत्रित आहे काही जुने विचार व काही नवीन विचार यांची मांडणी करून ते त्यांचे स्वतःचे विचार समाजात पसरवतात. दीनदुबळ्यांना मदत करणे हे त्यांचे नेहमीचे कार्य आहे. ते एक समाजाचा एक अविभाज्य भाग आहे तुमच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळणे हे एक समाजासाठी खास आहे. तुमचे सर्व धडे समाजासाठी हृदयस्पर्शी आहे. आपण प्रेरणादायी आणि परिपूर्ण हा मनमिळावू स्वभाव व केलेले कार्य सर्वांच्या आवडीचं, तर तुमचा आदर्श सर्वांनी घ्यावा आपण पैशाचा विचार न करता नेहमी समाजसेवेसाठी वाहून गेलात, सामाजिक उपक्रमात आपला सिंहाचा वाटा आहेच. आपल्या आई- वडिलांनी दिलेली शिकवण आपण जोपासता. मूळ संस्कार महत्त्वाचे आहे त्याचे पालन तुम्ही काटेकोर करीत आहे. तुमचा मित्र परिवार सुद्धा मोठा असून आपण त्यांना संघटित करून योग्य दिशा दर्शविण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहे. आपल्यासारखे महान व्यक्तिमत्व मिळणे कठीण बाब बनली आहे. तुमच्यात संघटन हा महत्त्वाचा गुण असल्याने आपण समाजातील वेगवेगळ्या लोकांना तुम्ही तुमचे विचार व्यक्त करून सोबत घेतले. तुमच्या पावलावर पाऊल ही मंडळी टाकीत आहे. ही बाब सहज शक्य नाही आपल्यातही दैवी शक्ती प्राप्त आहे, असेच म्हणावे लागेल. आपली एक जमेची बाजू समाजाची सेवा करणे आपल्या जीवनात कधीच दुःखाची सर नसावी प्रत्यक्षात सुखद भरलेली आपली ओंजळ आहे. देवाने आपल्याला आनंद द्यावा की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तळसावे, उत्कर्षाची रहावी कधी नं पाहून तुम्ही आनंदाची आठवण करत आहे. तुम्हाला लाभो ही शुभेच्छा आपण समाज घडवण्यासाठी परिवर्तनाची शक्ती आहात. आपण गोरगरीब मित्रांना मदत करून आपली कार्यशैली समाजाला दाखवून दिली आहे.आपण एक प्रतिष्ठित पत्रकार आहात एक संवेदनशील आणि सामाजिक भान असणाऱ्या कृतिशील संजय संजयच आहे. आपणास दूरदृष्टी ती आहे. सामाजिक भान दाखवत आपण हे कार्य करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी, कष्ट करण्याची, मित्र जोडायचे नाही तर ते टिकवायचे हे आपल्या संस्कारातून दिसून येते. आपण समाजासाठी सक्रिय आहेत एका हाकेला आपण धावून जातात व मदत करता ही एक बाजू आहे दिलदार व्यक्तिमत्व समाज सेवेला स्वतःला वाहून घेऊन सर्वसामान्यांसाठी तन-मन-धन लावून आपण काम करत आहे. प्रत्येक काम काळजीपूर्वक मनापासून करत असतात नव्या पिढीचे प्रश्न विचार आणि आम्हाला हवी असणारे बदल हे कदाचित फार वेगळे आहे याचा विचार करणार व्यक्तिमत्व आकर्षित करणारा व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आहेत. आपण एक सर्व मित्रांचे मार्गदर्शक ठरित आहात. सामाजिक कर्तव्याची जाण नेहमी समाजकार्यात आपण दिलेला आहे. अध्यात्मिक साहित्यिक वैचारिक शक्तीला सोबतीला घेऊन आपण जुनी विचारांचा विचार मांडून तेव्हाची परिस्थिती आजची परिस्थिती त्यासोबत बदल घडवून आणण्यासाठी समाजाला योग्य दिशा दाखवणारे नवीन पिढीला आदर्श विचाराने घेऊन नवीन पिढी आदर्श होईल या हेतूने समाजाला आपण नवीन दिशा मिळावी यासाठी अनेकदा मार्गदर्शन सुद्धा करता. परिस्थिती नाजूक असून सुद्धा आपण जीवनात कोणाचेही मन दुखावली नाही. सर्वधर्म समभाव जोपासण्याचा व आपल्या परीने योगदान सुद्धा आपण दिले आहे. मातृ- पितृ सेवा ही काळाची गरज आहे समाजाला उद्धभोदन करणारे हसतमुख मृदूभाषीक प्रत्येक व्यक्ती हा आपलाच आहे. सहकार्य करणे आपला मानवधर्म आहे.नवीन पिढीला आपण वाचाल तर वाचाल हे भारतरत्न डॉ.बाबासाहेबांचे वाक्य आवर्जून सांगतात.शाहू, फुले, आंबेडकर, गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार जरी समाजाला तरुण वर्गाला, समजविले तरी ते कार्य महान आहेच. मित्र वाढदिवसाच्या आजच्या दिवशी सुख, समृद्ध, आरोग्यदायी, यशदाई जाओ आपण नेहमी सामाजिक कार्यात जोसाने काम करता अजून आपणास ईश्वर शक्ती प्रदान होवो हीच या निमित्याने हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
संकलन :
शेषराव गो. कडू
वरुड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या