spot_img

*लोकनेते रमेशभाऊ वरकड स्मृतीदिन समारोहाचे ६ ऑक्टोबरला आयोजन* *# संगितमय श्रद्धांजली, भजन, किर्तन, महाप्रसाद* *#आ.दादाराव केचे, आ.सुमित वानखेडें यांची राहणार उपस्थिती

वर्धा:लोकनेते रमेशभाऊ वरकड यांच्या ७ स्मृती दिनानिमित्त दि.६ ऑक्टोबर रोजी साहूर येथे स्मृतीदिन समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. वृक्षारोपण, भजन, किर्तन, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहे.

दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजलीचा मुख्य कार्यक्रम होईल. यावेळी आ.दादाराव केचे. आ.सुमित वानखेडे, माजी खासदार रामदास तडस, भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य गटनेत्या नंदाताई रमेशराव वरकड, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर, भाजपा जेष्ठ नेते उत्तमराव करांगळे, भाजपा तालुकाध्यक्ष सचिन होले, माजी जि‌‌.प.सदस्य छायाताई घोडीले, माजी पं.स.उपसभापती गोविंदा खंडाळे, सरपंच प्रकाश गायकवाड, उपसरपंच रिताताई ढवळे, सावंगाचे सरपंच विनोद सोनोने, सेवा सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर भोरे आदी उपस्थित राहणार आहे.

तत्पूर्वी सकाळी ७ वाजता वृक्षारोपण होईल. सकाळी ९ वाजता गायक प्रशांत रोंघे तसेच योगेश चांदुरकर, विनय तळहांडे व संच संगितमय श्रद्धांजली सादर करतील. सकाळी १० वाजता हा.भ.प.नारायणदास महाराज पडोळे यांचे किर्तन, सत्संग होणार आहे. दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम व त्यानंतर आरती, मौन श्रद्धांजली, जयघोष, प्रसाद व दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. गावकऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन रमेश खरबडे, मनोहर बिजवे, गोपाल गावंडे, प्रशांत काकपुरे, श्रीकृष्ण खिरडकर, राजेश खरडे, राजू राऊत, गजानन भोरे, दिपक ढवळे यांनी केले आहे.

*लोकनेते रमेश वरकड यांच्याविषयी*
लोकनेते रमेश वरकड हे तीनदा साहूर ग्रामपंचायतचे सरपंच, तीनदा जिल्हा परिषद सदस्य, एकवेळ पंचायत समिती सदस्य व पं.स.उपसभापती, जिल्हा परिषदेच्या कार्यकाळात जिल्हा नियोजन समिती सदस्य व जि.प.सदस्य नसतांनाच्या काळात जिल्हा नियोजन समितीचे शासन नियुक्त निमंत्रित सदस्य असे तब्बल ३५ वर्ष ते पंचायतराज संस्थेत पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या