spot_img

धनगर समाजाच्या घरकुलाचा प्रश्न निकाली : सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांना यश *आर्वी 240 तर करंजा येथे 11 घरकुल मंजूर

आर्वी : आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात असणार्‍या धनगर कुटुंबाचा घरकुल योजने समावेश करण्यात यावा या मागणीसाठी यांचे मानद सचिव सुमित वानखेडे यांना त्यावेळी वानखेडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून प्रयत्न करण्यात येईल दरम्यान आज नागपूर येथील अधिवेशनात घरकुल योजनेचा प्रश्न आर्वीतून दिलेल्या निवेदनाची धनगरांना तर संघातील आर्वी 240 तर करंजा येथे 11 घरकुल मंजूर झाले आहेत.
ऑक्टोबर महिन्यात दिलेल्या निवेदनानंतर वानखेडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

दम्यान 11 डिसेंबर रोजी शासनाने आदेश काढल्याने राज्यातील धनगर समाजाच्या घरकुलचा प्रश्न निकाली निघाला आहे.
धनगर समाजासाठी घरे बांधण्याच्या योजनेंतर्गत जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, धनगर समाज घरकुल योजना जिल्हास्तरीय समिती, वर्धा यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीने प्रशासकीय मान्यता दिलेल्या व सहायक आयुक्त, समाजकल्याण, वर्षा यांनी संदर्भ क्र. 3 येथील पत्रान्वये शासनास सादर केलेल्या एकूण 548 वैयक्तिक लाभाध्यांच्या प्रस्तावास शासनाची मंजूरी देण्यात आली असून त्यासाठी
6.57,60,000 /- (रुपये सहा कोटी सत्तावण्ण लाख साठ हजार अनुज्ञेय आहेत. निधी खर्च करताना वित्त विभागाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयातील अटी-शर्तीचे पालन करावे लागेल असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यात असणार्‍या धनगर कुटुंबासाठी घरकुल योजनेची लाभार्थीं यादी मंजूर करून अनुदान उपलब्ध करून देण्या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमित वानखेडे यांच्याकडे सकल धनगर समाज आर्वी यांनी निवेदन सोपवले. निवेदनकर्त्यांच्या मागणी संदर्भात सुमित वानखेडे यांनी सविस्तर माहिती घेत धनगर समाजाच्या प्रतिनिधी मंडळाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम भटक्या जमाती ’क’ प्रवर्गासाठी घर बांधण्याची योजना
06/9/2019 ला जाहीर करण्यात आली होती. या योजनेकरिता वर्धा जिल्हयातील आर्वी तालुका 229 प्रस्ताव व कारंजा तालुका 11 प्रस्ताव असे एकूण 240 प्रस्ताव संबधीत विभागाकडे प्राप्त झाले आहेत व या करिताचे प्रस्ताव क्र. 02 नुसार इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे यांना ते प्रस्ताव पाठवले होते.

ऑक्टोबर महिन्यात सुमित वानखेडे यांना आग्रही मागणी केली आहे की, सदर प्रस्तावांना मंजुरी देवुन याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा व आम्हा सर्व समाज बांधवांच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. सुमित वानखेडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या मागणीने कारंजा तालुक्यातील बोरगाव गोंडी, बोटोना, सेलू तालुक्यातील रेहकी, आर्वी तालुक्यातील धनोडी, राजापूर, ईटलापूर, नांदपूर, शिरपूर, दहेगाव गोंडी, सुकळी उबार, हैबतपूर, खरांगणा, तळेगाव रघुजी, विरुळ, रोहणा, खुबगाव, यासह हिंगणघाट, वर्धा येथील धनगर समाजाच्या घरकुल योजनेचा प्रश्न निकाली निघाला.
………………….

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या