spot_img

*आपल्या धर्माला पाखंडी लोकापासुन वाचविण्याची गरज* *असेच संघटीत राहा पाच वर्षात भारत हिन्दु राष्ट्र होईल* हभप श्री पुरुषोत्तम पाटील यांचे आव्हान

*वरुड दि २४*

1947 पासुन पहिल्यांदा देशाला मान कोणामुळे मिळाला तो प्रधानमंञी नरेन्द्र मोदी यांच्यामुळेच असे उदबोधन आवाजाचे जादुगर ह भ प श्री पुरुषोत्तम पाटील यांनी किर्तनातुन केले संत अच्युत महाराज जन्मशताब्दीनिमित्त आयोजित जाहिर किर्तनात ते बोलत होते व्यासपीठावर ह भ प अँड श्री सचिन देव महाराज होते ते म्हणाले की राममंदीर
हिन्दु लोकांचे आहे ते बीजेपीचे मंदीर नाही,श्री रामचंद्रप्रभु यांच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमात पुढारी नव्हते तर देशातील संत महात्मे उपस्थित होते
श्रध्देने स्थिर होण्यासाठी मंदीराची गरज आहे

धर्माला पाखंडी लोकापासुन वाचविण्याची गरज आहे कारण अशा पाखंडी लोकापासुन देश व धर्म सावध असावा तर धर्माच्या विरुध्द बोलणा-याचा निषेध करायला पाहिजे असा खडा सवाल हि त्यांनी केला

मानसाने माणसाशी प्रेमाने वागणे हाच खरा धर्मा
पाखंडी लोकांचे खंडन करणे,आवश्यक आहे
हिन्दुधर्माचे प्रभु रामचंद्र जगाचे आदर्श आहेत

संत अच्युत महाराज सभाग्रुह हजारो श्रोत्यांनी भरगच्च भरले होते
सर्वप्रथम द्विप प्रज्वलन हभप श्री पुरुषोत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले व त्यांचे स्वागत संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष श्री सुधीर दिवे व आयोजक दत्ताभाऊ शिंदे यांनी केले विश्वस्तांनी त्याचे सामुहिक स्वागत केले एका मोठा पुष्पहाराने सामुहिक रित्या हभप श्री पाटील यांचे स्वागत करण्यात आले
आपल्या किर्तनातुन उदबोधन करतांना हभप श्री पाटील म्हणाले की
कलियुगात नामस्मरणाला जास्त महत्व आहे भगवंताच चिंतन महत्वाच आहे

माणसाने माणसाशी अपेक्षा करु नये
अपेक्षा देवा कडे करा
संत आपल्या समस्या नक्कीच दुर करतील
जय जय राम क्रुष्ण हरी
जय जय राम क्रुष्ण हरी
जय जय राम क्रुष्ण हरी एवढेच म्हणा
अच्युत महाराजांना आनंदच होईल धर्माच्या विरुध्द बोलणा-यांना त्याच वेळेस उत्तर द्या
निषेध करा सांप्रदांयाच्या विरोध कोणी बोलत असेल तर त्याला उत्तर द्या
बजरंग दलाच्या कार्यकर्त्यामुळेच वारकरी संप्रदाय टिकुन राहिल
या देशाला सर्वात मोठी भीती व्यसनापासुन आहे
जीवनात व्यसन करु नका
असेच संघटीत राहा पाच वर्षात भारत हिन्दु राष्ट्र होईल
हभप श्री सचिन महाराज अयोध्येला गेले हे आमच्या विदर्भाचे प्रतिनिधीत्व केले आम्ही त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतो असे हि पाटील म्हणाले
सर्वप्रथम बजरंग दलाच्या कार्यालयात त्यांचे पुष्पव्रुष्टीने स्वागत करण्यात आले तर व्यासपीठावर हि बजरंग दल व सर्व विश्वस्तांनी त्यांचे जंगी स्वागत केले
कार्यक्रमाचे संचालन गायञी परिवारचे अध्यक्ष गिरिधर देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन आयोजक दत्ताभाऊ शिंदे यांनी केले संत अच्युत महाराज जन्मभुमि संस्थानचे सर्व विश्वस्त अथक परिश्रम घेत आहे
– अध्यक्ष श्री संत अच्युत महाराज जन्मशताब्दी महोत्सव समिती, वरुड

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या