तळेगाव शामजी बातमीदार: वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा व संत मारुती महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त अंतोरा येथे दिनांक १२/१/२०२४ ते १९/१/२०२४ पर्यंत ह भ प विवेकजी गाडगे महाराज यांच्या मधुर वाणीतून शिव पुराण कथा अध्यात्म चिंतन व प्रबोधन तसेच दिनांक १८/१/२०२४ रोजी सप्त खंजिरी वाजक सत्यपाल महाराज यांचे समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी ज्येष्ठ मार्गदर्शक मा. अनंतराव माहोड होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे तथा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मुंबई, ईश्वर वरकड माजीप:स. सदस्य, अनिल धोत्रे नगराध्यक्ष नगरपरिषद आष्टी, रवींद्र गंजीवाले अध्यक्ष आष्टी तालुका काँग्रेस कमिटी , जितेंद्र शेटे सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, ह भ प शाम महाराज अयोध्या, सौ शालिनी कोडापे आष्टी तालुका महिला काँग्रेस कमिटी, उत्तमराव घाडगे अध्यक्ष तालुका काँग्रेस अनुसूचित जमाती, निरंजन कोहळे उपसरपंच ग्रामपंचायत खंबित चंद्रशेखर जोरे, तिलकचंद कोहळे , देविदास जाणे , भीमरावजी घावट, देविदास पाथरे, बाबासाहेब कथले, शेखर केचे आदींची उपस्थिती होती.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना अमर काळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचे विचार आत्मसात करून अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. सध्या परिस्थिती त जाती जातीत ते निर्माण करून धर्मांत शक्तीला तळा दिला जात आहे. युवक वर्गामध्ये मोबाईलच्या अतिवापरामुळे मनोरुग्ण तरुणांची संख्या वाढ होत आहे ही चिंताजनक बाबा अशी खंत व्यक्त केली.
अध्यक्ष भाषण बोलताना अनंतराव मोहोड म्हणाले की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित असलेल्या “माणिकगड’ टेकडीवर व्यायाम शाळा अभ्यासिका केंद्र उभारण्याचा मानस व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे संचालन आशिष मोहोड, प्रास्ताविक चंद्रशेखर जोरे, तर आभार प्रदर्शन प्राचार्य सतीश का कातोडे यांनी केले.
या कार्यक्रमाची महाप्रसादाने सांगता झाली.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी वृंद, विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व महिला वर्गाकडून उत्तम असा प्रतिसाद मिळाला.