spot_img

*सर्कसपूर येथे आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न 🚩*

आर्वी तालुक्यातील सर्कसपुर येथील हनुमान देवस्थान प्रांगणात प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२३ – २४ अंतर्गत हनुमान मंदिर सुशोभीकरण व सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी १५ लक्ष रूपये किमतीच्या मंजूर कामाचे भूमिपूजन आमदार दादाराव केचे यांच्या हस्ते तथा सुमित वानखेडे वर्धा लोकसभा प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

गेल्या अनेक वर्षांपासून सर्कसपूर वासिंयांची गावातील मुख्य देवस्थान हनुमान मंदिरात सभागृह असावे अशी मागणी होती. या करीता हनुमान मंदिर ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने आमदार दादाराव केचे यांच्याशी संपर्क साधून मागणी संदर्भात निवेदनातून कळवले होते. तसेच सुमित वानखेडे यांनाही मंदीर ट्रस्टने निवेदन दिले असता क्षणाचाही विलंब न लावता पर्यटन विकास योजनेंतर्गत हा निधी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून दिला. एकीकडे अयोध्येत प्रभू श्री रामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे आणि त्यातच हनुमान मंदिरात सभागृहाच्या कामाचे भुमिपुजन झाल्याने सर्कसपूर वासिंयांनी समाधान व्यक्त करत आनंद व्यक्त करत आहेत.

या भुमिपुजन समारंभाला गोपीनाथ कडू अध्यक्ष हनुमान मंदिर ट्रस्ट, सचिंन्द्र कदम, अश्विन शेंडे, गजानन हनवते सरपंच, निखिल कडू, धर्माजी तेलमोरे, उमेश गोरले, विजय सोलव, शाम सरोदे, दिगांबर सोलव, सचिन कडू, मंगेश रहाटे, निलेश सहारे पोलीस पाटील, जयश्री सोलव, पुनम गोरले, रोशनी गोरले, तुषार कडू, अजिंक्य कडू, अरूण कडू, रेखा कडू, रेखा सरोदे, नंदा सरोदे, उषा सरोदे, उषा कडू, वैशाली कडू, रंजना कडू, सिमा कडू, शिला सरोदे, संजय सोलव, पुंडलिक सरोदे, राहुल गोरले, अजाबराव सोलव, मालू फाले, जनार्दन बरडे, पंडीतराव बरडे, विठ्ठल कुरवाडे, सुभाष गोरले,प्रभा कडू, मंदा सोलव, इंदिरा जुनघरे, अंकुश कडू, ज्ञानेश्वर गोरले, उज्वला गोरले, केशव गोरले, दामोदर गोरले, पंचफुला रहाटे, छाया मात्रे, सुभाष सरोदे, दुर्गा गोरले, सुमित सोलव, तुषार सरोदे, कार्तिक गोरले, रोषन गुडधे यांच्यासह अनेक महीला व पुरुषांची लक्षणीय उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या