कारंजा(घा)- सैन्यदलात अग्निविर म्हनून कार्यरत असलेल्या येथील वार्ड क्र. 1 मधील रहिवाशी सागर मारोतराव सरोदे वय 22 वर्ष याचे आज दिल्ली येथील आर एन आर आर्मी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले,
भारतीय लष्करामध्ये कर्तव्य बजावत असतांना दि,19 शुक्रवारला तीन अग्निविर वाहनात बसून असलेल्या वाहनाला अपघात झाला होता, व ते वाहन पलटी झाले, या अपघातात सागर गंभीर जखमी झाला होता, त्याला तात्काळ प्राथमिक उपचारानंतर दिल्ली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, पण गेल्या पाच दिवसापासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या सागरची अखेर आज प्रानज्योत मावळली, ही बातमी गावात पोहताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. उद्या दि,26 शुक्रवाला प्रजासत्ताक दिनी त्याच्या पार्थिव कारंजा येथे आल्यानंतर शासकीय इतमामात कारंजा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे, त्याचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने नागपूर येथे आणण्यात येणार आहे, एक वर्षपूर्वी च तो अग्निविर म्हणून भारतीय लष्करात रुजू झाला होता, तो सध्या पंजाब राज्यात फिरोज येथे आपले कर्तव्य बजावत होता, एक वर्षाच्या सेवेतच नियतीने डाव साधुन सागराला हिरावून नेले लष्कराची सेवा बजावत असतांना अपघातात त्याला विर मरण प्राप्त झाले.
त्यांच्या अकाली निधनाने सरोदे परीवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.