वर्धा (प्रतिनिधी )
सद्गुरू परमहंस श्री कृष्णगिरी वार्षिक पुण्यतिथी महोत्सव स्व. शंकरबाबा गुल्हाणे व स्व. विमलआई शंकरराव गुल्हाणे यांच्या पावन स्मृतिप्रित्यर्थ दि. ५ फेब्रुवारी ते१२ फेब्रुवारी दरम्यान आयोजित आला आहे. या वार्षिक पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दि. ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान दररोज कथा प्रवते हभप श्री. रामेश्श्वरजी खोडे महाराष्ट्र राज्य शासन
पुरस्कृत प्राप्त व्यसनमुक्त प्रचारक ईसापूर यांचे प्रवचन राहणार आहे. दि. ५ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारी दरम्यान श्री. कृष्णगिरी महाराजांचे अभिषेक व कलश स्थापना दररोज सकाळी ६.३० ते ७.३० पर्यंत काकड आरती, परमहंस श्री. कृष्णगिरी महाराज लिलामृत चरित्रवाचन हभप श्री. हरिहर देशपांडे महाराज धोत्रा रेल्वे यांचे दररोज सकाळी १० ते ११ पर्यंत प्रवचन, ५ फेब्रुवारीला कथा प्रारंभ व्याख्यान, ६ फेब्रुवारीला श्री ध्रुवकथा, ७ फेब्रुवारी र रोजी श्री प्रल्हाद कथा, ८ फेब्रुवारीला श्री. नंदोत्सव, ९ फेब्रुवारीला श्री गोवर्धन पुजा, १० फेब्रुवारीला श्री कृष्ण रुख्मिणी विवाह, ११फेब्रुवारीला श्री सुदामा चरित्र व परिक्षित मोक्ष, होमहवन, व १२ फेब्रुवारीला रथयात्रा, श्री गोपालकाला कीर्तन सोहळा तथा महाप्रसाद, तसेच दि. १२ फेब्रुवारीला सकाळी ७ ते ११ दरम्यान सकाळी ७ ते ११ रथयात्रा व दिंडी सोहळा टाल व ढोलताशाच्या होणार आहे. त्यानंतर गोपालकाला व तिर्थ उद्यानयात्रा कार्यक्रम पार पडणार आहे. दुपारी २ ते ३ पर्यंत श्री. संत सयाजी श्री. संत माधवानंदजी महाराज, मयूर महाराज, मधुकरजी खोड़े महाराज यांच्या हस्ते महाआरती व संत दर्शन होणार आहे व दुपारी ३ ते ६ पर्यंत महाप्रसादाने या संपूर्ण वार्षिक पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप होणार आहे. असे आयोजन समितीतर्फे अनिल गुल्हाणे, प्रमोद श्रीराव, राहुल शर्मा, अतुल वांदिले, आशीष तिवारी, सुरेंद्र महाकाळकर, संदिप चिचाटे, घनश्याम पुरोहित, महेश गुल्हाणे यांनी सर्व भाविकभक्तांनी लाभ घेण्यासाठी आवाहन केले आहे.