आर्वी तालुक्यातील शहर तथा ग्रामीण भागातील कुणबी समाजाच्या प्रातिनिधिक शिष्टमंडळाने सुमित वानखेडे यांची भेट घेऊन आर्वी शहरात ‘सकल कुणबी समाज भवन’ मंजूर करून त्याचे भव्य दिव्य निर्माण व्हावे यासाठी चर्चा करून निवेदन दिले. सविस्तर चर्चे दरम्यान ‘सकल कुणबी समाज भवनाची’ आवश्यकता व उपयोगीता लक्षात घेऊन सुमित वानखेडे यांनी कुणबी समाज शिष्टमंडळास सकारात्मक प्रतिसाद दिल्याने महाराष्ट्रात प्रथमच ‘सकल कुणबी समाज भवन’ निर्मितीस श्रीगणेश झाला आहे.
आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात कुणबी समाजाची संख्या मोठया प्रमाणात आहे. कुणबी समाजाचा मुख्य व्यवसाय शेती आहे. बदलत्या निसर्ग चक्राने गेल्या काही वर्षात कुणबी समाजाचा शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे गरीब कुणबी समाजातील परिवारातील सामाजिक व पारिवारिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाजाचे सभागृह नसल्याने नाईलाजास्तव खाजगी कार्यालय भाड्याने घेवुन कार्य प्रसंग पार पाडावे लागतात. समाजातील लोकांना कार्यालयाचे वाढते भाडे परवडत नसल्याने प्रसंगी बाहेरून कर्ज काढुन कार्य प्रसंग पार पाडावा लागतो. मोठे कार्यप्रसंगासाठी विविध स्वरूपातून रक्कम जमा करता करता समाज बांधव कर्जाच्या विळख्यात सापडतात. त्यामुळे हे चित्र बदलण्यासाठी ‘सकल कुणबी समाज भवनाची’ नितांत गरज सद्यस्थितीत आहे.
कुणबी समाजाला इतर समाजाप्रमाणे समाजाचे हक्काचे सभागृह नाहीच. त्यामुळे कुणबी समाजाचे सामाजिक, सांस्कृतिक व पारिवारिक कार्य प्रसंग आर्वी येथे पार पाडण्यासाठी भव्य दिव्य “सकल कुणबी समाज भवन” देण्याची मागणी केली आहे.
निवेदन देते वेळी राजेंद्र पावडे, अशोक निकम, गौरव ठाकरे, अमोल शेंडे, सचिंन्द्र कदम, अश्विन शेंडे, ओमप्रकाश कडू, निखिल कडू, अमोल बोबडे, निलेश देशमुख, एम. व्ही. कळमकर, नरेश गेडाम, हर्षल शेंडे, प्रमोद दाऊतपुरे, हर्षल पांडे, मंगेश सरोदे, छत्रपती बोके, कार्तिक काळे, संजय दांदडे, प्रविण पावडे,मनोज कसर, योगेश सरोदे, धर्मेद्र राऊत, दर्शनकुमार चांभारे, जितेंद्र ठाकरे, मनोज कसर, सुहास देशमुख, मनिष उभाड , विशाल राऊत, यशवंत भोयर, सुहास ठाकरे, चंद्रशेखर शेंडे, शाम सरोदे, रमेश हांडे, बाळाभाऊ सोनटक्के, अजिंक्य कडू, रूपेश शेंडे, नितीन कदम,राहुल चौधरी, कुमार गेडे, यांच्यासह अनेक समाजबांधवांची समाज प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थिती होती.