spot_img

*साहूर येथील कबड्डी स्पर्धेत आष्टीचा संघ ठरला प्रथम* *लोकनेते स्वर्गीय रमेशभाऊ वरकड स्मृती प्रित्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे उत्कृष्ठ आयोजन*

*साहूर(प्रतिनिधी)*:- लोकनेते स्वर्गीय रमेशभाऊ वरकड यांच्या स्मृति प्रित्यर्थ साहूर येथे नवनिर्मित क्रीडा मंडळाच्या वतीने ५६ किलो वयोगटातील भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आष्टी येथील तानाजी क्रीडा मंडळाच्या कबड्डी संघाने २१ हजार रुपयाचे पहिले बक्षीस व टॉफी जिंकून प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. द्वितीय क्रमांक जय बजरंग क्रीडा मंडळ खैरगाव या संघाने १५हजार रुपये व टॉफि असे पारितोषिक पटकाविले.तृतीय क्रमांक नवयुवक क्रीडा संघ टेंभरी परसोडी यांनी अकरा हजार रुपयांचे पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकाविले असून चौथा क्रमांक महालक्ष्मी क्रीडा मंडळ वाडेगाव च्या संघाने पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह पटकावले वैयक्तिक बक्षीसामध्ये उत्कृष्ट रेडर प्रज्वल खर्डे उत्कृष्ट पकड आदेश नेरकर उत्कृष्ट डिफेंडर सागर वरकड यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन सरपंच प्रकाश गायकवाड,उपसरपंच रिताताईढवळे, भाजपचे ज्येष्ठ नेते उत्तमराव करांगळे, राष्ट्रीय कीर्तनकार गजानन भोरे, पत्रकार ओंकार दंडाळे, दिनेश वरकड, प्रशांत काकपुरे,राजेश खरडे,मनोहर बिजवे,रमेश खरबडे,सुरेश ठाकरे, पंजाबराव मापारी, चेतन भोरे,ऋषी वरकड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पद्माकर काळे, सुनील कंगाले ,रमेश कुरवाडे, गणेश कुरवाडे ,सागर अमझिरे, निलेश खरबडे ,धनराज बोरवार ,मनीष उईके, पंकज उईके, एकनाथ अमझिरे, निखिल पेंदाम, प्रमोद कुरवाडे, सचिन नांदणे ,हिमांशू राऊत, अमोल नांदणे, अवधूत ढोमणे ,गोपाल अमझिरे, उमेश ढोमणे ,दर्शन पचारे, दिनेश कुरवाडे, संदीप कुरवाडे ,अनुप मुंदाने, वेदांत वरकड ,जय गोमासे ,रोहित वरकड, आदर्श राऊत, ओम लवणकर, विश्वजीत वरकड, कुणाल उन्होने ,रजत दंडाळे इत्यादी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या