spot_img

*आर्वी विधानसभा क्षेत्रातून 2500 युवा कार्यकर्त्यांचा नागपूर येथील महा संम्मेलनात सहभाग 🚩* *सुमित वानखेडे यांच्या आवाहनाला युवकांचा उदंड प्रतिसाद 🚩* *सुमित वानखेडे यांचा कार्यकर्त्यांसह कार्यकर्ता म्हणून सहभाग 🚩*

आर्वी विधानसभा क्षेत्रातील आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील प्रत्येक बुथ मधील युवा कार्यकर्त्यांनी नागपूर येथील युवा महा संम्मेलनात सहभागी होण्यासाठी वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांनी आवाहन केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनानुसार आर्वी विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या 2500 युवा कार्यकर्त्यांनी सक्रियतेने सहभाग नोंदविला. नागपूर येथील मुख्य कार्यक्रम स्थळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या, महाराष्ट्र प्रदेश भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, युवा मोर्चा प्रदेश राहुल लोणीकर, जितेंद्र कुकडे यांच्यासह खासदार व आमदारासह मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

आर्वी विधानसभा क्षेत्रातून युवकांचा सहभाग व्हावा म्हणून सुमित वानखेडे यांच्या सकारात्मक प्रयत्नाने भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष ते बुथ अध्यक्ष यांची सांगड घालून कार्यक्रमात आर्वीचा आवाज बुलंद करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील नागरीकांची सुमित वानखेडे यांच्या प्रती विश्वासार्हता प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्यांनी आखलेल्या प्रत्येक कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यासह नागरीकांचा भरभरून प्रतिसाद पाहता भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य वाढत आहे. येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाची मजबूत पकड घट्ट होत आहे. याची प्रचिती आर्वी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरवात झालेल्या नागपूर यात्रे दरम्यान जागोजागी कार्यकर्ते व नागरींकांचा उदंड प्रतिसादात सुमित वानखेडे यांचे गावोगावी जंगी स्वागत झाल्याने दिसुन आले. त्यामुळे संपूर्ण परीसरात भाजपा प्रती सकारात्मक चर्चा रममाण झाली आहे.

कार्यक्रमाला उपस्थित आर्वी, आष्टी व कारंजा च्या कार्यकर्त्यांमध्ये सुमित वानखेडे यांनी त्यांच्यासह साधारण कार्यकर्त्यासम कार्यक्रमाचा आस्वाद घेणे पसंत केल्याने सर्वांमध्ये त्यांच्या साधेपणाचीच चर्चा रंगली होती. त्यांना नेता म्हणून मंचकावर सहभागी होता आले असते परंतू त्यांनी कार्यकर्त्यासह सामान्य कार्यकर्ता प्रमाणे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह सहभाग घेतला हे विशेषच..

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या