spot_img

*देवळी येथे पॅसेंजर रेल्वे गाडीचे प्रथम आगमन..* *आज पासून रेल्वे सुरू ऐतिहासिक नोंद.* *प्रथम टिकीट घेऊन देवळी वर्धा प्रवासी म्हणून अभियंता अशोक राऊत, यांनी केला प्रवास.*

देवळी प्रतिनिधी

कळंब वर्धा प्रथमच सुरू झालेली प्रवासी गाडी आज २८ फेब्रुवारी ला संध्याकाळी देवळी रेल्वे स्थानकावर आगमन होताच उपस्थित नागरिकांनी व प्रवाशांनी या रेल्वे गाडीचे मोठया उत्साहित स्वागत केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवी झेंडी दाखवून कळंब येथून ही प्रवासी गाडी वर्धा कडे रवाना झाली या गाडीचे देवळी येथे आगमन होताच इंजन पायलट आणि गार्ड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अशोकराव राऊत यांनी स्वागत केले.या टीकीट विक्रीची सुरुवात अशोक राऊत यांनी प्रथम टीकीट घेतल्यावर टीकीट विक्रीची सुरुवात केली.ही रेल्वेगाडी आठवड्यातून पाच दिवस धावणार असून बुधवार आणि रविवार दोन दिवस बंद राहणार आहेत. या सुरू झालेल्या रेल्वे गाडीला प्रवाशाचा कसा काय प्रतिसाद मिळतो गाडीच्या फेऱ्या सुरू झाल्यावरच प्रवाशाची चढ उतारीवर या गाडीला मिळणारे आर्थिक उत्पन्न ठरणार आहे. रेल्वेच्या प्रथम आगमना प्रसंगी रेल्वेचे कर्मचारी प्रवीण गांधी, व्ही आर भाले,अमित आर वरके, जी एस भुरे, व पोलीस कर्मचारी यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.

फोटो ओळी मध्ये प्रथम टिकीट घेताना अभियंता अशोक राऊत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या