spot_img

१४ सरपंचाची तक्रार जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे तक्रार वादग्रस्त गटविकास अधिकारीच्या बदलीची केली मागणी, राजकीय भेदाभेद व हुकुमशाही पध्दीतीने कारभार करण्याचा केला आरोप

आर्वी,दि.१३:- राजकीय भेदाभेदा व हुकूमशाही पध्दतीने कारभार करणाऱ्या गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे यांची त्वरीत बदली करा अन्यथा आंदोलन करावे लागेल अशी मागणी सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (ता.१३) वर्धा जिल्हाधिकारी कार्डीले यांच्या कार्यालयात निवेदन देवुन केली आहे.
गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे ह्या हुकूमशाही पध्दतीने कामे करतात. शेतींची कामे संपल्यात जमा झाली असुन ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देण्याच्या दृष्टीने शासनाने रोजगार हमी योजना सुरू केली आहे. मात्र गटविकास अधिकारी यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काम करीत असलेल्या ग्रामरोजगार सेवकांना साधा मॅसेज पाठवुन बंद केले, परिणामी रोजगार हमी योजनेची कामे बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐवढच नाहीतर प्रगतीपथावर असलेल्या घरकुल लाभार्थ्यांचे अनुदान भेट होईस्तोवर त्यांच्या खात्यावर जमा केल्या जात नाही. मर्जीतील व्यक्तीला खुश करण्याकरीता शासकीय नियम डावलुन चुकीच्या पध्दतीने घरकुलाला मंजूरी दिल्याजाते. शासकीय कार्यक्रम घेतांना राजकीय भेदाभेद निर्माण करुन आपआपसात भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात. गावातील कामे घेवुन जाण्याऱ्या सरपंचांना तासंतास कक्षा बाहेर ताटकळत ठेवण्याची त्यांची पध्दत आहे. क्षणोक्षणी टोमणे मारुन अपमानीत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शासकीय खर्चाने होणाऱ्या कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळल्या जात नाही. पदावर नसलेल्या व्यक्तीला मानसनमान देवून सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अपमान जनक वागणुक दिल्या जात असल्याचे आरोप सरपंच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनामधुन लावली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्यामुळे कार्यालयातील तहसीलदार (सं.गा.यो.) बबिता आळंदे यांनी हे निवेदन स्वीकारले असुन निवेदन देणाऱ्यामंध्ये सचिन पाटील, रज्जाक अली, महेंद्र मानकर, सौ. अश्विनी गळहाट, पवनकुमार गवळी, सुचिताताई जाधव, सौ. प्रिती श्रीरामे, ॲड. दुर्गाप्रसाद मेहरे, पुंडलीकराव साठे, वसंत भगत, सुरेंद्र धुर्वे, विशाखाताई कळंबे, गजानन हनवते, सौ. भारती सोमकुवर आदि सरपंचांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या