*सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नाने मिळाला घरकुल धारकांना हफ्ता 🚩*
*आर्वी शहरातील घरकुल धारकांना मिळणार उर्वरित रक्कम 🚩*
आर्वी नगरपरिषद हद्दीतील मंजूर घरकुलांच्या हफ्ता लवकर मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाचे वर्धा लोकसभा प्रमुख सुमित वानखेडे यांना घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांनी विनंती मागणी केली होती. या मागणीला अनुसरून सुमित वानखेडे यांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व तांत्रिक अडचणी वेळोवेळी पाठपुरावा करून निकाली काढण्यात यश मिळाले. याची फलश्रुती आर्वी शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या डीपीआर च्या ३१७ घरकुलांचा व दुसऱ्या डीपीआर च्या १९३ घरकुलांचा शेवटचा ३० हजार रुपयांचा हफ्ता म्हाडा कडून आज प्राप्त झाला. उर्वरित निधीची मागणी येत्या २ दिवसात करण्यात येणार असून घरकुल धारकांना याचा लाभ होईल.
याबद्दल घरकुल लाभार्थ्यांनी सुमित वानखेडे यांचे मनापासून आभार मानले आहेत. याच बरोबर सामान्य नागरिकांनी सुमित वानखेडे यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत आर्वी विधानसभेच्या आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील जनतेच्या मागणीला पुरेपूर दाद देऊन सुमित वानखेडे प्रत्येक समस्या निकाली काढण्यात यशस्वी होत आहे सोबतच न भुतो विविध जन उपयोगी विकास कामे क्षेत्रात त्यांच्या माध्यमातून आल्याने आर्वी विधानसभेत सुमित वानखेडे यांच्या नावाचीच चर्चा जागोजागी होत आहे.